<b>`फायलिन`ची तीव्रता कमी केली मुंबईतील प्राध्यापकाने! </b>

`फायलिन` हे चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. त्यामुळे खूप मोठी वित्त आणि जीवीत हानी होऊ शकते. याबाबतची कल्पना पाच दिवसांपूर्वीच कपिल गुप्ता या मुंबई आयआयटीच्या प्राध्यापकाने दिली होती. त्यामुळे लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात सरकारला यश आले आणि मोठी हानी टाळण्यात सरकार यशस्वी झाले आहे.

Updated: Oct 14, 2013, 01:55 PM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, मुंबई
`फायलिन` हे चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. त्यामुळे खूप मोठी वित्त आणि जीवीत हानी होऊ शकते. याबाबतची कल्पना पाच दिवसांपूर्वीच कपिल गुप्ता या मुंबई आयआयटीच्या प्राध्यापकाने दिली होती. त्यामुळे लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात सरकारला यश आले आणि मोठी हानी टाळण्यात सरकार यशस्वी झाले आहे.
कपिल गुप्ता यांचे सगळीकडे कौतुक होत आहे. कपिल गुप्ता यांनी फायलिनविषयी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेला (एनडीएमए) कल्पना दिली होती. या माहितीमुळे एनडीएमएला त्वरित कारवाई करून हानी टाळण्यात आली.
या वादळाविषयी कल्पना देणारे गुप्ता हे पहिले व्यक्ती होते. गुप्ता हे ७ ऑक्टोबरला रात्री साडेअकरा वाजता अमेरिकेच्या हवाई दल व नौदलाचे संकेतस्थळ पाहत असताना त्यांना बंगालच्या उपसागरातून हे वादळ येत असल्याचे दिसले. त्यांनी लगेच एनडीएमएला याबाबत सांगितले. गुप्तांच्या सूचनेनंतर लगेच एनडीएमएने हालचाली करत किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोचविले आणि हाय अलर्ट जारी केला.
गुप्ता हे २००५ पासून नागरी भागात येणाऱ्या पुराविषयी अभ्यास करत आहेत. त्यांचा चक्रीवादळ आणि पावसाविषयी चांगला अभ्यास आहे. एनडीएमएचे उपाध्यक्ष एम. शशीधर रेड्डी यांनी सांगितले की, भारताच्या दिशेने मोठे चक्रीवादळ येत असल्याची सॅटेलाईट छायाचित्र गुप्ता यांनी आम्हाला पाठविल्याने आम्ही सतर्क झालो आणि आम्हांला या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यास खूप मदत झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.