बँकांना पुढील चार दिवस सुटी

बँकांना पुढील चार दिवस सुटी राहणार आहे. २४ डिसेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुटी असेल, तर २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस, तर २६ डिसेंबर रोजी चौथा शनिवार असेल, २७ डिसेंबर रोजी रविवार आहे.

Updated: Dec 23, 2015, 11:56 AM IST
बँकांना पुढील चार दिवस सुटी title=

मुंबई : बँकांना पुढील चार दिवस सुटी राहणार आहे. २४ डिसेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुटी असेल, तर २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस, तर २६ डिसेंबर रोजी चौथा शनिवार असेल, २७ डिसेंबर रोजी रविवार आहे.

मात्र शनिवारी एटीएममध्ये कॅश भरण्याचं काम काही बँकाकडून करण्यात येणार आहे. यासाठी कॅश भरण्यासाठी काही कर्मचारी उपस्थित राहणार आहेत, मात्र याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार किंवा इतर व्यवहार होणार नसल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे. 

एसबीआयच्या एटीएममध्ये कॅश भरण्याचं काम शनिवारी सुरू राहणार असल्याने कॅश काढण्यास फारशी अडचण येणार नसल्याचं सांगण्यात येतंय.