पॉर्न दाखवत होती राधे माँ, भक्त उतरवत होते माझे अंतर्वस्त्र - डॉली बिंद्रा

 स्वतःला देवीचा अवतार म्हणवणारी स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँचे आता सारे कर्म आणि कांड समोर येत आहेत. एका नंतर एक आरोप तिच्यावर लावण्यात येत आहे. राधे माँला अटक झाली तर तिला बाहेर येणे मुश्किल होणार आहे. 

Updated: Sep 2, 2015, 06:04 PM IST
पॉर्न दाखवत होती राधे माँ, भक्त उतरवत होते माझे अंतर्वस्त्र - डॉली बिंद्रा

मुंबई :  स्वतःला देवीचा अवतार म्हणवणारी स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँचे आता सारे कर्म आणि कांड समोर येत आहेत. एका नंतर एक आरोप तिच्यावर लावण्यात येत आहे. राधे माँला अटक झाली तर तिला बाहेर येणे मुश्किल होणार आहे. 

हुंड्यासाठी छळ, अश्लिलता पसरविणे आणि धमकी देण्याच्या आरोपानंतर राधे माँवर असा आरोप लावण्यात आला, जो तुम्हांला सुन्न करेल. बिग बॉसच्या घरातील सदस्य असलेल्या डॉली बिंद्रा हिने राधे माँ विरोधात तक्रार दाखल केली आहे. 

अधिक वाचा : राधे माँ थीम पार्टीचा फोटो वायरल, ट्विटरवर जोरदार चर्चा

डॉलीने आपल्या तक्रारीत म्हटले की राधे माँ मला आपल्या बेडरूममध्ये घेऊन जात होती. तेथे आयपॅडवर पॉर्न फिल्म दाखवत होती. तसेच राधे माँचे भक्त तिच्यासमोर अश्लिल डान्स करत होते. तसेच माझे अंतर्वस्त्र काढत होते. डॉली बिंद्राने आरोप लावला की राधे माँ ड्रग्जचाही बिझनेस करत आहे. डॉलीच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी राधे माँ विरोधात अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

विशेष म्हणजे डॉली बिंद्रा एकेकाळी राधे माँची परम भक्त होती. जागरण आणि धार्मिक कार्यक्रमात ती राधे माँच्या शेजारी दिसत होती. यापूर्वी राधे माँने आपल्या जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही डॉली बिंद्राने केला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.