मुंबई : गुरुवारी रात्री उशिरा चेंबूरच्या स्मशानभूमीत शहीद सुधीर अमीन यांच्यावर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काळबादेवी आगीत सुधीर अमीन हे गंभीर जखमी झाले होते.
अमीन यांचा सात वर्षांचा मुलगा अशेष यानं अग्नी दिला. यावेळी अमीन यांचं कुटुंबिय आणि सहकार्यांना अश्रू अनावर झाले होते.
काळबादेवीतल्या भीषण आगीत गंभीर जखमी झालेले अमीन यांच्यावर ऐरोलीच्या नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. अमीन हे कार्यक्षम अधिकारी होते. अमीन यांचे पार्थिव भायखळ्याच्या अग्निशमन कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली.
महापालिका आयुक्त अजॉय मेहता, स्थायी समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव, मनसेचे बाळा नांदगावकर यांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं.
अमीन यांच्यामागे पत्नी आणि ६ वर्षाची मुलगी आणि ७ वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
गुरुवारी रात्री उशिरा चेंबूरच्या स्मशानभूमीत शहीद सुधीर अमीन यांच्यावर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काळबादेवी आगीत सुधीर अमीन हे गंभीर जखमी झाले होते.
अमीन यांचा सात वर्षांचा मुलगा अशेष यानं अग्नी दिला. यावेळी अमीन यांचं कुटुंबिय आणि सहकार्यांना अश्रू अनावर झाले होते.
काळबादेवीतल्या भीषण आगीत गंभीर जखमी झालेले अमीन यांच्यावर ऐरोलीच्या नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. अमीन हे कार्यक्षम अधिकारी होते. अमीन यांचे पार्थिव भायखळ्याच्या अग्निशमन कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली.
महापालिका आयुक्त अजॉय मेहता, स्थायी समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव, मनसेचे बाळा नांदगावकर यांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं.
अमीन यांच्यामागे पत्नी आणि ६ वर्षाची मुलगी आणि ७ वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.