मुंबई पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराने हादरली

मुंबईत पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. अंधेरीतल्या अंबोलीमधील शामनगर भागात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आहे.

Updated: Nov 1, 2016, 12:35 PM IST
मुंबई पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराने हादरली title=

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. अंधेरीतल्या अंबोलीमधील शामनगर भागात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आहे.

महिला ही तिच्या पतीसोबत शामनगर येथील झोपडपट्टीत घर शोधत होते. रात्री हे दोघेही एका महिलेच्या घरी थांबले. त्या दरम्यानच या परिसरातील ८ जणांनी या महिलेवर बलात्कार केला.

अंबोली पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून एक आरोपी अजूनही फरार आहे.