मी आग लावणारा नेता-राज ठाकरे

आता मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आणि मुंबईत राहूनही सगळी मुंबई न बघितलेल्यांना एक सुवर्णसंधी चालून आली आहे. 

Updated: Oct 31, 2016, 09:57 PM IST
मी आग लावणारा नेता-राज ठाकरे

मुंबई : आता मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आणि मुंबईत राहूनही सगळी मुंबई न बघितलेल्यांना एक सुवर्णसंधी चालून आली आहे. एका खासगी कंपनीनं ओपन जीपमधून मुंबईची अर्बन सफारी सुरू केली आहे. या ओपन जीपमधून मुंबईतल्या सुमारे 200 ऐतिहासिक स्थळांची सफर करता येणार आहे.  

दक्षिण मुंबईतल्या एका पेट्रोल पंपावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या टूरचं उद्घाटन झालं. या उद्घाटनावेळी राज ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली आहे. मी आग लावणारा नेता आहे, त्यामुळे पेट्रोल पंपावर उद्घाटनाला बोलवणाऱ्यांच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले आहेत.