गिरगाव चौपाटी होणार ५२ लाखांच्या यंत्राने आता चकाचक

दक्षिण मुंबईला लाभलेला छान समुद्रकिनारा म्हणजे मुंबईची गिरगाव चौपाटी. परंतु नेहमीच समुद्रकिनाऱ्यावर फिरायला  जाणाऱ्या प्रत्येकाकडूनच तेथे असणाऱ्या कचऱ्याचा आणि तेथील घाणीचा तक्रार होताना दिसतो. समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येणाऱ्यांकडून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याने रोज कचराकुंडी होत असलेली गिरगाव चौपाटी स्वच्छ करण्यासाठी ५२ लाख रुपयांचे यंत्र घेण्यात आले आहे.पालिकेच्या कंत्राटाचा हा भाग असल्याने त्याची त्यांना वेगळी किंमत मोजावी लागणार नाही. ह्या यंत्रामुळे गिरगाव चौपाटीचा सव्वा लाख चौरस मीटरचा किनारा अवघ्या चार तासात स्वच्छ केला जातो.

Updated: Dec 12, 2014, 08:01 PM IST
गिरगाव चौपाटी होणार ५२ लाखांच्या यंत्राने आता चकाचक title=

मुंबई : दक्षिण मुंबईला लाभलेला छान समुद्रकिनारा म्हणजे मुंबईची गिरगाव चौपाटी. परंतु नेहमीच समुद्रकिनाऱ्यावर फिरायला  जाणाऱ्या प्रत्येकाकडूनच तेथे असणाऱ्या कचऱ्याचा आणि तेथील घाणीचा तक्रार होताना दिसतो. समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येणाऱ्यांकडून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याने रोज कचराकुंडी होत असलेली गिरगाव चौपाटी स्वच्छ करण्यासाठी ५२ लाख रुपयांचे यंत्र घेण्यात आले आहे.पालिकेच्या कंत्राटाचा हा भाग असल्याने त्याची त्यांना वेगळी किंमत मोजावी लागणार नाही. ह्या यंत्रामुळे गिरगाव चौपाटीचा सव्वा लाख चौरस मीटरचा किनारा अवघ्या चार तासात स्वच्छ केला जातो.

पालिकेसाठी समुद्रकिनाऱ्याचा कचरा अतिशय त्रासदायक ठरत आहे.  याच गिरगाव चौपाटीवर दररोज तब्बल सहा टन कचरा गोळा केला जातो. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात पालिकेने स्पर्न इन्फ्रा जॉइंट व्हेन्चर या कंपनीला सात वर्षांसाठी साडेतीन कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. या कंत्राटाअंतर्गत किनारा स्वच्छ करण्यासाठी यंत्र, ते चालवण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली, कचरा कुंडय़ा आणि कचरा वाहून नेणारे वाहन घेणे अत्यावश्यक होते. त्यानुसार वर्षभराने गिरगाव चौपाटीसाठी नवीन यंत्र आणले गेले आहे. या यंत्राच्या खाली असणारी वैशिष्टय़पूर्ण पाती वाळूच्या आतमध्ये सहा इंच जाऊन सूक्ष्म कचराही बाहेर काढतात. यंत्रामधील जाळीवरून कचरा आणि वाळू वेगळे होऊन कचरा कंटेनरमध्ये साठविला जातो तर वाळू पुन्हा चौपाटीवर टाकण्यात येते.

या यंत्राचे काम तीन पाळ्यांमध्ये चालणार असून  सकाळ आणि संध्याकाळी यंत्रासोबतच १२ सफाई कर्मचारीही स्वच्छता मोहिमेवर असतील. रात्री फक्त यंत्राच्या साहाय्याने कचरा वेचला जाईल. रोज होणाऱ्या या कचऱ्या सफाई करणाऱ्या पालिकेने नागरिकांना चौपाटीची स्वचछता ठेवण्यासाठी आवाहन दिले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.