खूशखबर... सोने डिसेंबरपर्यंत २५ हजारांवर!

तुळशीच्या विवाहानंतर लग्नाचा मौसम सुरू होईल. त्यामुळं मुहूर्तांसाठी वधुपित्यांची घाई सुरू झाली आहे. त्यातच धनत्रयोदशीनंतर सोन्याचे भाव हळूहळू घसरू लागल्यामुळं सर्वांनी आतापासूनच सराफा दुकानांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान डिसेंबरपर्यंत सोन्याचे भाव २५ हजार रुपयांपर्यंत खाली येतील, असं अर्थतज्ज्ञांनी म्हटलंय. त्यामुळं यंदा लग्नाचे बार आता दणक्यात उडणार आहेत.

Updated: Nov 5, 2014, 09:21 AM IST
खूशखबर... सोने डिसेंबरपर्यंत २५ हजारांवर! title=

मुंबई: तुळशीच्या विवाहानंतर लग्नाचा मौसम सुरू होईल. त्यामुळं मुहूर्तांसाठी वधुपित्यांची घाई सुरू झाली आहे. त्यातच धनत्रयोदशीनंतर सोन्याचे भाव हळूहळू घसरू लागल्यामुळं सर्वांनी आतापासूनच सराफा दुकानांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान डिसेंबरपर्यंत सोन्याचे भाव २५ हजार रुपयांपर्यंत खाली येतील, असं अर्थतज्ज्ञांनी म्हटलंय. त्यामुळं यंदा लग्नाचे बार आता दणक्यात उडणार आहेत.

जागतिक बाजारपेठेत सोन्याची मागणी कमी झाली आहे. त्यामुळं सोन्याच्या भावातही घसरण होत आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्थाही सुधारत आहे. त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणून सोन्याच्या भावात घसरण होत असल्याचं अर्थतज्ज्ञांनी म्हटलं आहे. डिसेंबरपर्यंत सोनं दीड हजार रुपयांनी खाली उतरून ते २४ हजार ५०० रुपये होण्याची शक्यता कमोडिटी बाजारात वर्तवण्यात आली आहे. परंतु डॉलरचं मूल्य स्थिर होऊ लागल्यामुळं डॉलरची गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळं सोन्यातली गुंतवणूक कमी होऊन सोन्याच्या भावात घसरण होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

दिवाळीनंतर भाव घसरला

- मंगळवारी मोहरम म्हणजेच सुट्टीचा दिवस असल्यामुळं सराफा दुकानांमध्ये प्रचंड गर्दी होती. धनत्रयोदशीनंतर सोन्याच्या भावामध्ये घसरण सुरू झाली आहे. त्यामुळं यंदाच्या दिवाळीपासूनच सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. सोन्याचे भाव कमी व्हावेत अशीच अपेक्षा सराफा बाजारातून व्यक्त होत आहे.

मोदी सरकार आल्यापासून अर्थव्यवस्थेत सकारात्मक घडामोडी दिसून येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून सोन्याच्या भावातही घसरण होत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदा सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी होताना दिसत आहे. ग्राहकांमध्ये खर्च करण्याची इच्छा आहे, असं सराफा व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.