सोने-चांदी दरात घसरण

सोने-चांदीच्या दरात गेल्या दोन दिवसांपासून घसरण झाली आहे. मागणीत झालेली घट आणि साठेबाजांनी केलेल्या विक्रीने सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात प्रति तोळा १७५ रुपयांची घट झाली. तर चांदीही २८० रुपयांनी स्वस्त झाली. मात्र, सोनेचा प्रति तोळा २७४१४.२ ते २८,३४५ रूपये दरम्यान दर आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 24, 2013, 01:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
सोने-चांदीच्या दरात गेल्या दोन दिवसांपासून घसरण झाली आहे. मागणीत झालेली घट आणि साठेबाजांनी केलेल्या विक्रीने सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात प्रति तोळा १७५ रुपयांची घट झाली. तर चांदीही २८० रुपयांनी स्वस्त झाली. मात्र, सोनेचा प्रति तोळा २७४१४.२ ते २८,३४५ रूपये दरम्यान दर आहे.
रूपया मजबूत झाल्याने सोने दरात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आहे. याचा परिणाम सोने बाजारावर दिसून येत आहे. तसेच जागतिक बाजारातील कमजोर संकेतांनीही सोने आणि चांदीतील तेजी कमी केली.
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीची मागणी घटली आहे. यामुळे भाव कोसळत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सोन्याच्या भावात १७५ रुपयांची घट झाली. यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. तसेच चांदीतही २८० रुपयांची घट झाली आणि चांदीचा भाव प्रति किलोला ४३,६७० वर बंद झाला. याआधीही चांदी ४५० रुपयांनी स्वस्त झाली होती.
सोने प्रति तोळा दर ( १० ग्रॅम)
मुंबई - २७४१४.२ (२२ कॅरेट), २९३२०.०० (२४ कॅरेट)
चेन्नई - २७८१६.२५ (२२ कॅरेट), २९७५०.००(२४ कॅरेट)
दिल्ली - २७६४७.९५(२२ कॅरेट), २९५७०.००(२४ कॅरेट)
कोलकाता - २७७६०.१५ (२२ कॅरेट), २९६९०.००(२४ कॅरेट),
केरळ - २७,६०१.२ (२२ कॅरेट),२९५२९.००(२४ कॅरेट),
बंगळुरू - २७६१९.९(२२ कॅरेट), २९५४०.०० (२४ कॅरेट),
हैदराबाद - २७६४७.९५ (२२ कॅरेट), २९५७०.०० (२४ कॅरेट)
चांदीचा किलोचा दर
-चेन्नई - ४३,३०५.०० रूपये
- मुंबई - ४३,३०५.०० रूपये
- कोलकाता - ४३,३०५.०० रूपये
-नवी दिल्ली - ४३,३०५.०० रूपये
पाहा तक्ता....

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.