www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
बऱ्याच दिवसांनी नागरिकांना दिलासा देणारी चांगली बातमी मिळतेय. भाज्या स्वस्त व्हायला सुरुवात झालीय. त्यामुळे वाढलेल्या घरखर्चाला कंटाळलेल्या नागरिकांना थोड्या प्रमाणात प्रमाणात का होईना पण दिलासा मिळेल.
सोमवारी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याच्या ६०० गाड्यांची आवक झाली. त्यामुळे भाज्यांच्या दरात जवळपास ३० टक्के घसरण झालीय. यापुढेही अशीच आवक राहिल्यास, येत्या काळात भाज्या आणखी स्वस्त होण्याची चिन्हं आहेत.
घाऊक बाजारात भाज्यांचे दर कमी झाले असले, तरी बऱ्याच ठिकाणी किरकोळ बाजारात व्यापाऱ्यांनी भाज्यांचे दर चढेच ठेवल्याची तक्रार आहे. त्यामुळे ग्राहकांनीही आपण योग्य दरात भाजी खरेदी करतोय का? याची खात्रीही करणं गरजेचं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.