कसाबच्या दफनविधीसाठी झाला सर्वात कमी खर्च...

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाब याच्या अटकेपासून ते फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीपर्यंत केंद्र सरकारनं २८.४६ करोड रुपयांचा खर्च केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 7, 2012, 11:48 AM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाब याच्या अटकेपासून ते फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीपर्यंत केंद्र सरकारनं २८.४६ करोड रुपयांचा खर्च केलाय. मुंबईच्या आर्थर रोडमध्ये राहणं, खाणं, कपडे, औषधं आणि सुरक्षा तसंच पुण्याच्या येरवडा जेलमध्ये दिलेल्या फाशीनंतर दफनविधीची प्रकिया पार पाडणं अशा खर्चांचा यामध्ये समावेश आहे.
अथक सेवा संघाचे अध्यक्ष अनिल गालगली यांच्याकडून माहितीच्या अधिकाराखाली याबद्दल माहिती विचारण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना सरकारनं कसाबच्या दफनविधीसाठी ९,५७३ रुपये, कपड्यांसाठी १६९ रुपये तर फाशीच्या दिवशी त्याच्या खाण्यासाठी ३३ रुपये ७५ पैसे खर्च केल्याचं म्हटलंय.
गालगली यांच्या म्हणण्यानुसार, माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जात सरकारकडून अनेक प्रश्नांची उत्तरं सरकारनं दिलीत पण यामध्ये पोस्टमॉर्टेम तसंच दया याचिकेसंबंधी कोणत्याही माहितीचा समावेश नाही.
महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, अटकेनंतर त्याच्या फाशीच्या शिक्षेपर्यंत त्याच्या खाण्यावर ४३,४१७.६७ रुपये, सुरक्षेवर १,५०,५७,७७४.९० रुपये तसंच दफनविधीसाठी ९,५७३ रुपये खर्च झालाय.