मुंबई : जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर जीवन आणि मृत्युचा थरार सुरू होता आणि तिथे उपस्थित अनेक जण त्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी धडपड करत होते... अपवाद होते एक आजोबा...
आजोबांनी बुडणाऱ्या मुलाला वाचविण्यासाठी थेट समुद्रात उडी घेतली... ते थोडे पुढे पोहोचलेसुद्धा... पण, तोपर्यंत उशीर झाला होता... आपल्या 16 वर्षांच्या नातवाला वाचविण्याची धडपड त्यांची धडपड अयशस्वी ठरली.
पण यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जुहू समुद्र किनाऱ्यावर लाईफ गार्डस्, पोलीस या सगळ्यांची गस्त असते. मात्र, नेमक्या या अर्ध्या तासासाठी इथे जीव वाचवायला कोणीच हजर नव्हतं... आता हे फक्त अर्ध्या तासासाठी होतं की कायमच इथे कोणी नसतं, हा प्रश्न उपस्थित होतोय.