रिक्षा-टॅक्सी भाडं : हकीम समिती रद्द, नवीन समिती नेमणार

रिक्षा आणि टॅक्सीच्या भाववाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आघाडी सरकारनं नेमलेली हकीम समिती रद्द करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलीय. त्याऐवजी एका नव्या समितीची स्थापना करण्यात येणार आहे. 

Updated: May 22, 2015, 04:08 PM IST
रिक्षा-टॅक्सी भाडं : हकीम समिती रद्द, नवीन समिती नेमणार title=

मुंबई : रिक्षा आणि टॅक्सीच्या भाववाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आघाडी सरकारनं नेमलेली हकीम समिती रद्द करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलीय. त्याऐवजी एका नव्या समितीची स्थापना करण्यात येणार आहे. 

हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली नवीन त्रिसदस्यीय समिती स्थापण्यात येणार आहे. या नव्या समितीत उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, निवृत्त परिवहन आयुक्त आणि वाहतूक तज्ज्ञांचा समावेश असेल. येत्या सहा महिन्यांत या नव्या समितीचा अहवाल येईल. सध्या जाहीर झालेली भाववाढ तात्पुरती असेल, अशी घोषणाही दिवाकर रावतेंनी केलीय. 

 हकीम समितीच्या अहवालातील शिफारशींमध्ये अनेक त्रुटी राहिल्याचंही रावते यांनी सांगितलंय. हकीम समितीच्या शिफारशींनुसार मे २०१५मध्ये लागू केलेली भाडेवाढ तात्पुरत्या स्वरूपात लागू होईल. पण, नवीन समितीचा अहवाल आल्यानंतर त्यातील शिफारशींनुसार नंतर भाडेवाढीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही रावते यांनी म्हटलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.