www.24taas.com,मुंबई
देशाची आर्थिक राजधानी बिरूद मिरवणारी मुंबई आता गलिच्छतेच्याबाबतीत अग्रेसर असल्यानंतर छेडछाडीतही नंबर वन असल्याने चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात महिलांची छेड काढण्याचे प्रकार वाढीस लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुंबई आणि दिल्लीत दिवसागणिक महिलांवर अन्यायातही वाढ झाली आहे. मुंबईने दिल्लीला मागे टाकते नंबर वन काढला आहे. देशभरातल्या तीन डझन शहरांपैकी बलात्कार, हुंडाबळीत दिल्ली तर छेडछाडीत मुंबई सर्वांत पुढे आहे. गुन्हेगारीच्या नावाने प्रसिद्ध असलेली उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक शहरे या यादीत खूप मागे पडली आहेत.
डोंबिवली मध्ये आणखी एका ९ वर्षीय चिमुरडीवर बालात्कारची घटना घडली आहे. पीडीत मुलीच्या शेजारी राहणा-या २४ वर्षीय नराधमाने शनिवारी दुपारी चिमुरडी घराजवळ खेळत असताना तिला फसवून शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मानपाडा पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवलीच्या खोणी गावात हा प्रकार घडलाय.
पुन्हा एकदा डोंबिवली शहर किती असुरक्षित आहे ते समोर आलंय. ४ डिसेंबरला डोंबिवलीमध्ये एका तरुणीची छेडछाड करणा-या रोमिओंना रोखणा-या संतोष विच्छीवोरा या तरुणाची हत्या झाली होती. तर एका महिलेची बस स्टॉपवर छेड काढणा-या एका डाक्चरच्या वर्तणुकीने खळबळ उडाली होती. आणि आता एका चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीए. त्यामुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
गेल्या काही दिवसांतील डोंबिवलीतील घटनांनी छेडछाडीच्या या राजधानीवर शिक्कामोर्तब झाले आहे. काजूपाडा येथील स्वामी विवेकानंद शाळेत सहावीतील विद्यार्थिनीला मागच्या बाकावर बसवून अश्लील चाळे करणार्यात के.पी. सिंग या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली. महिला अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांचे पथक कामाला लागले असले तरी ठाणे जिल्ह्यातील या घटना कमी होत नाहीत. डोंबिवली, उल्हासनगर आणि मुरबाडमध्ये बलात्काराच्या एकाच दिवशी तीन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबईत बलात्काराच्या (२२१), हुंडाबळी (१४), विनयभंग (५५३) तर छेडढाडीच्या १६२ घटना घडल्या आहेत. दिल्लीत १४९ तर कोलकातामध्ये १४४ घटना घडल्यात. तर विनयभंग दिल्लीत जास्त आहेत. ५५६ घटनांची नोंद असून बंगळुरूत २५० तर कोलकात्यात २५४ घटना घडल्या आहेत. तर दिल्लीत बलात्काराच्या सर्वाधिक म्हणजे ४५३ घटना असून मुंबईत २२१ गुन्ह घडलेत. ही आकेवाडी २०११मधील आहे.