भारतावरचा हल्ला 'त्या' घटनेचा बदला घेण्यासाठीच : हेडली

पाकिस्तानी-अमेरिकी अतिरेकी आणि मुंबईतील २६/११ हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. १९७१ साली त्याच्या शाळेवर भारतीय लष्कराने केलेल्या कथित बॉम्ब हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तो लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संस्थेत दाखल झाल्याचे त्याने सांगितले.

Updated: Mar 25, 2016, 10:59 AM IST
भारतावरचा हल्ला 'त्या' घटनेचा बदला घेण्यासाठीच : हेडली title=

मुंबई : पाकिस्तानी-अमेरिकी अतिरेकी आणि मुंबईतील २६/११ हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. १९७१ साली त्याच्या शाळेवर भारतीय लष्कराने केलेल्या कथित बॉम्ब हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तो लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संस्थेत दाखल झाल्याचे त्याने सांगितले.

७ डिसेंबर १९७१ साली भारतीय लष्कराच्या विमानांनी माझ्या शाळेवर हल्ला केला. त्या हल्ल्यात तिथे काम करणारे अनेक लोक मारले गेले. तेव्हापासून माझ्या मनात भारताविषयी तिरस्काराची भावना होती आणि आहे, असे हेडली म्हणाला.

या साक्षीदरम्यान त्याने आणखी एक खुलासा केला आहे. शिवसेनेसाठी निधी उभारण्यासाठी अमेरिकेत एक कार्यक्रम आयोजित केला जाणार होता. या कार्यक्रमासाठी बाळासाहेब ठाकरेंना अमेरिकेला बोलावले जाणार होते. त्यांच्यावर तेथे हल्ला करण्याचा मात्र त्याचा कोणताही इरादा नव्हता, अशी माहिती हेडलीने दिली.

सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्याच्या साक्षीदरम्यान हेडलीने चार मोठे गौप्यस्फोट केले आहेत. २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यानंतर डेव्हिड हेडलीच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हाचे पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी हेडलीच्या घरी भेट दिली होती. हेडलीच्या वडिलांना त्याचे लष्करशी संबंध असल्याची कल्पना असल्याची माहिती त्याने दिली आहे.