मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकाअंतर्गत कोणत्याही व्यावसायीक आणि निवासी बांधकामांना परवानगी न देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.
वाढत्या लोकसंख्येमुळं अधिकृत आणि अनधिकृत बांधकामांचं प्रमाण वाढलंय. त्यामुळं शहरातल्या कचरा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचं मत हायकोर्टानं नोंदवलंय.
याचा कल्याण-डोंबिवलीत सध्या सुरू असलेल्या बांधकामांना फटका बसणार असून बांधकाम व्यावसायीक अडचणीत येण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.