भटक्या कुत्र्यांच्या हल्यातील जखमींना नुकसान भरपाई द्या - हायकोर्ट

गेल्या काही महिन्यांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढू लागल्यात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या हल्याच्या घटनांची गंभीर दखल न्यायालयाने घेतलीये.

Updated: Oct 28, 2016, 11:10 AM IST
भटक्या कुत्र्यांच्या हल्यातील जखमींना नुकसान भरपाई द्या - हायकोर्ट title=

मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढू लागल्यात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या हल्याच्या घटनांची गंभीर दखल न्यायालयाने घेतलीये.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना पालिकेनं नुकसान भरपाई देण्याचा विचार करावा. नाहीतर त्याबाबतचे आदेश जारी करावे लागतील, अशी तंबी न्यायालयाने दिलीये. तसेच या घटनांची जबाबदारी पालिकेने घ्यावी असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. 

सांगलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे स्पष्ट केले. 

तीन वर्षांपूर्वी तेजसचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. याप्रकरणात २० लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.