चक्क लग्न मंडपातून 'घोडी' पळाली

लग्न मंडपातून 'वर तथा नवरा' किंवा 'वधू तथा नवरी' पळून गेल्याची बातमी अनेकवेळा वाचली, ऐकली असेल, मात्र लग्न मंडपातून चक्क एका घोडीनेच पळ काढल्याची घटना मुंबईत घडली. याचीच सध्या चर्चा सुरु आहे.

Updated: Jun 26, 2015, 06:29 PM IST
चक्क लग्न मंडपातून 'घोडी' पळाली title=

मुंबई : लग्न मंडपातून 'वर तथा नवरा' किंवा 'वधू तथा नवरी' पळून गेल्याची बातमी अनेकवेळा वाचली, ऐकली असेल, मात्र लग्न मंडपातून चक्क एका घोडीनेच पळ काढल्याची घटना मुंबईत घडली. याचीच सध्या चर्चा सुरु आहे.

लग्न समारंभात धावपळ सुरु होती. सर्वजण लग्नात मग्न होते. मात्र, 'पायल' या घोडीला बांद्रा येथे एका लग्नासाठी नेले जात होते. या घोडीने चक्क लग्न मंडपातून पळ काढला. ही पायल रस्ताने पळत होती. रस्तावर गाड्यांचा ताफा दिसत होता.
 
घोडीला बांद्रा येथे एका लग्नासाठी नेले जात होते, मात्र त्याचवेळी कचरा गोळा करणारा एक ट्रक त्यांच्या मागे येत होता, ट्रकच्या हॉर्नमुळे बिथरलेल्या पायलला तिच्या घोडेस्वाराने शांत केले. काही वेळानंतर तो ट्रक खड्ड्यात आदळल्यामुळे झालेल्या मोठ्या आवाजामुळे पायल पुन्हा बिथरली आणि तिने तिच्या घोडेस्वाराला खाली फेकून दिले आणि पळ काढला. 

पायलने वांद्रे-वरळी सी लिंक गाठत तब्बल ४१३ फुटांचा प्रवास केला. सी-लिंकवरील हजारो वाहनांसोबतच एक घोडी पळताना पाहून प्रवाशांच्या भुवया उंचावल्या होत्या. टोलनाक्यावरील कर्मचारी व प्रवासीही तिला पाहून चक्रावले. मात्र तिला थांबवायचे, हा प्रश्न त्यांना पडला. काही प्रवाशांनी पोलीस कंट्रोल रूमला फोन करून या घटनेची माहिती दिली आणि तिला थांबवण्यासाठी पोलिसांनी तिच्या मागे धाव घेतली.

मात्र पायलनेत संपूर्ण सी-लिंक पार करेपर्यंत तिला न पकडण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. कारण तसे केल्यास ती आणखी बिथरून आजूबाजूच्या वाहनांना धडकून जखमी होण्याची वा वाहनांना नुकसान पोहोचवण्याची शक्यता होती. किंवा घाबरल्यामुळे ती समुद्रात उडी टाकेल, अशी भीतीही पोलिसांना होती. अखेर काही इस्रायली नागरिकांनी तिला पकडून शांत करण्यात यश मिळवले. त्यानंतर पायलची रवानगी पशुसंवर्धनगृहात करण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.