मुंबई : उद्धव ठाकरे यांचे पीए राजाराम रेगे यांची मदत घेऊन लष्कर-ए-तोयबा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला करणार होते, असा गौप्यस्फोट दहशतवादी डेव्हिड हेडलीनं आजच्या साक्षीत केलाय.
त्यासाठी हेडली रेगेंना आपल्या चक्रव्युहात अडकवण्याच्या प्रयत्नात होता. राजाराम रेगे हा हेडलीच्या सतत संपर्कात होता. मेल, फोन आणि एसएमएस द्वारे राजाराम रेगे हेडलीच्या संपर्कात होते.
१९ मे २००८ साली राजाराम रेगेंनी हेडलीला मेलद्वारे एक इन्व्हेस्टमेंट प्रपोजल पाठवलं. तो मेल हेडलीने तहव्वूर राणा, मेजर इक्बाल आणि लष्कर कमांडर अब्दुल रेहमान पाशाला पाठवला.
त्यानुसार राजाराम रेगेच्या प्रोजेक्टमध्ये तहव्वूर राणा पैसे गुंतवायला तयार होता. तर, मेजर इक्बालला राजाराम रेगेचा वापर भारतीय आर्मीचा गुप्तहेर म्हणून करण्यात रस होता आणि साजीद मीरला राजाराम रेगेचा वापर करुन बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला करण्याकरता कट रचायचा होता.
१९ मे रोजी राजाराम रेगेने डेव्हिड हेडलीला एक मॅसेज केला होता. 'कॉल मी प्लीज' असा तो मेसेज होता. त्यावर हेडलीने साजीद मीरला मेल केला आणि तोदेखील हिंदीत...
'मेल पढकर मुझे तुरंत जवाब दो, रेगे ने मुझे एसएमएस कर के फोन करने कहा है,
आप लाईन ऑफ एक्शन सोच के, मुझे तुरंत रिप्लाय दो' असा तो मेल होता.