www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
माहिती काढून घेण्यासाठी `थर्ड डिग्री`चा वापर करताना आता पोलिसांना जरा सावधच राहावं लागणार आहे.
कारण चौकशीच्या नावाखाली बेकायदा अटक केलेल्या व्यक्तीला मारहाण न करताच, पोलिसांनी माहिती कशी काढून घ्यावी याचे प्रशिक्षण आता पोलिसांना देण्यात येणार आहे.
या प्रकारे माहिती काढण्याचे प्रशिक्षण द्यावे, असे आदेश राज्य मानवी हक्क आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत.
दहिसर भागातील अमित पारेख नावाच्या व्यक्तीचे दोन जणांशी भांडण झाल्याने दहिसर पोलिसांनी या तीन जणांविरूद्ध १ ऑगस्ट २०११ रोजी अदखलपात्र तक्रार नोंदवली होती. यावेळी सहाय्यक पोलिस इन्स्पेक्टर खटके हे पोलिस स्टेशनमध्ये ड्युटीवर होते.
तेव्हा एक रिक्षाचालक तेथे आपल्या रिक्षा चोराची तक्रार करण्यास तेथे आला. सहाय्यक पोलिस खटके यांनी त्यावेळी अमित पारेखवर रिक्षा चोरीचा संशय घेऊन त्याला पट्ट्याने मारहाण केली.
पोलिस स्टेशनमध्ये झलेला सर्वप्रकार अमितने आपल्या आईला सांगितला. अमितच्या आईने राज्य मानवी हक्क आयोगाकडे या विषयी तक्रार केली. या संदर्भात आयोगाचे अध्यक्ष न्या. एस.आर. बन्नुरमठ यांनी डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल तपासला. यात अमितला पट्टयासारख्या वस्तुने मारहाण झाल्याचे आदेशात स्पष्ट झाले. याशिवाय अन्य तपशील लक्षात घेत अमित याला बेकायदा अडकून ठेवल्याबद्दल दहिसर पोलिसांवरही त्यांनी ठपका ठेवण्यात आला.
अध्यक्ष न्या. बन्नुरमठ यांनी पोलिसांना सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करायला सांगीतले. तसेच राज्य सरकारला या प्रकरणाबाबत अमित पारेख याला मारहाण केल्याने मानवी हक्काची पायमल्ली केल्याचे निदर्शनात आणून देत, सरकारने अमितला ५० हजार रूपयांची भरपाई द्यावी असा आदेश दिला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.