येमेनमधून ३५८ भारतीय सुखरूप मायदेशी परतले

येमेनच्या युद्धभूमितून २५८ भारतीय नागरीक सुखरूप मायदेशी परतले आहेत. त्यातील १६८ नागरीक कोचीला आणि १९० नागरीक मुंबई विमानतळावर आज पहाटे पोहोचले.

PTI | Updated: Apr 2, 2015, 03:06 PM IST
येमेनमधून ३५८ भारतीय सुखरूप मायदेशी परतले title=

मुंबई/कोची: येमेनच्या युद्धभूमितून २५८ भारतीय नागरीक सुखरूप मायदेशी परतले आहेत. त्यातील १६८ नागरीक कोचीला आणि १९० नागरीक मुंबई विमानतळावर आज पहाटे पोहोचले.

भारतीय वायुसेनेच्या विमानानं १६८ भारतीय कोची विमानतळावर पहाटे २ वाजता तर C17 ग्लोबमास्टरमधून १९० भारतीय नागरीक मुंबईत दाखल झालेत. 

परराष्ट्र मंत्रालयानं ट्विटरवरून ही माहिती दिली. नौदलाच्या आयएनएस सुमित्रामधून मंगळवारी रात्री ३५८ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली. अॅडन बंदरावरून बोटीनं भारतीय नागरिकांना हलवून डिजीबौती इथं आणलं आणि तेथून त्यांची भारताकडं रवानगी करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या भारतीयांमध्ये २२० पुरूष, १०१ महिला आणि २८ लहान मुलांचा समावेश आहे.
 
येमेनमध्ये अडकलेल्या सुमारे चार हजार नागरिकांच्या सुटकेसाठी भारत सरकारनं जोरदार मोहिम राबविली आहे. भारतीयांना परत आणण्यासाठी दोन प्रवासी जहाजांबरोबरच आता दोन युद्धनौकाही पाठविल्या आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.