मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या - काँग्रेस

 राज्यात ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले. अहमदनगर सामूहिक बलात्कार प्रकरण आणि नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या कैद्यांवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार माणिकराव ठाकरे यांनी केलीय.

Updated: Apr 2, 2015, 12:10 AM IST
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या - काँग्रेस title=

मुंबई : राज्यात ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले. अहमदनगर सामूहिक बलात्कार प्रकरण आणि नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या कैद्यांवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार माणिकराव ठाकरे यांनी केलीय.

या दोन्ही प्रकरणावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव आणला.. या मुद्यावर चर्चेची मागणी विरोधकांनी केली. तर काल शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेनेही सरकारला घेरले होते. 

शेतमालाच्या हमीभावासाठी विरोधकांसह शिवसेना आमदारांनी विधानसभेत सरकारला घेरले. सरकारनं सर्व शेतक-यांना न्याय द्यायला  हवा अशी भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली. तर उसाला मदत द्यायला विरोध नाही मात्र कापूस, सोयाबिन आणि धानालाही मदत देण्याची मागणी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या आमदारांनी केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.