वजन कमी करण्याबाबत इमानच्या बहिणीचा आरोप चुकीचा-डॉक्टर

इजिप्तहून भारतात वजन घटवण्यासाठी आलेल्या इमानचं वजन तीनशेपेक्षा जास्त किलोंनी कमी झालंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 25, 2017, 04:37 PM IST
वजन कमी करण्याबाबत इमानच्या बहिणीचा आरोप चुकीचा-डॉक्टर title=

मुंबई : इजिप्तहून भारतात वजन घटवण्यासाठी आलेल्या इमानचं वजन तीनशेपेक्षा जास्त किलोंनी कमी झालंय. इमान आली तेव्हा तिचं वजन तब्बल पाचशे किलो होतं, आता यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तिचं वजन 171 किलो झालंय. आता तिची प्रकृती उत्तम आहे. आजच तिचं सिटी स्कॅन करण्यात आलं. 

सिटी स्कॅनचं मशीन फक्त 204 किलोंचं वजन पेलू शकतं. त्यामुळे आज पहिल्यांदाच इमानचं सिटीस्कॅन करण्यात आलं. इमानच्या वजनामध्ये अपेक्षित घट झाली नाही, आणि यासंदर्भातले डॉक्टरांचे दावे खोटे असल्याचा आरोप इमानच्या बहिणीनं केला होता. पण तो चुकीचा असल्याचं इमानवर उपचार करणा-या टीममधल्या डॉ अपर्णा यांनी स्पष्ट केलंय.