दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

दहावीच्या विद्यार्थ्यांना, 500 रुपयांची जुनी नोट भरुनही परीक्षेचा फॉर्म आता भरता येणार आहे. 

Updated: Nov 13, 2016, 04:37 PM IST
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी   title=

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांना, 500 रुपयांची जुनी नोट भरुनही परीक्षेचा फॉर्म आता भरता येणार आहे. 

पूर्व मुंबईतल्या भांडुपमधल्या अमरकोर शाळेतल्या विद्यार्थ्यांचा एसएससीचा फॉर्म भरुन घेण्यासाठी, शाळेनं विद्यार्थ्यांकडे वापरात असलेल्या चलनातल्या नोटा आणण्याची सक्ती केली होती. त्याची बातमी झी मीडियानं दाखवली होती. 

या बातमीची दखल भाजप खासदार किरीट सोमय्यांनी घेत, राज्याचे अर्थमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा केला. त्यामुळे आता जुन्या 500 च्या नोटा सुद्धा एसएससीचा फॉर्म भरण्यासाठी वापरता येणार आहेत.