अंधेरीत भरधाव कारने ६ जणांना चिरडले

मुंबईतील अंधेरीमध्ये एका भरधाव कारने ६ जणांना चिरडले. काल रात्री ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झालेत.

Updated: Jan 10, 2016, 02:38 PM IST
अंधेरीत भरधाव कारने ६ जणांना चिरडले title=
संग्रहित

मुंबई : मुंबईतील अंधेरीमध्ये एका भरधाव कारने ६ जणांना चिरडले. काल रात्री ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झालेत.

७४ वर्षीय श्रीचंद्र पंजाबी हे तेली गल्लीतून जात होते. त्याच वेळी त्यांचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कारनं रस्त्यावरील एका कुटुंबाला चिरडले. यात कुटुंबातील पती-पत्नीसह दोन मुली गंभीर जखमी झाल्यात.

तर इतर दोन तरुणही या अपघातात जखमी झालेत. या सर्वांना उपचारासाठी क्रिटीकेअर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अघातानंतर कार चालक फरार झाला आहे.