मुंबई : साखर, गॅस, पेट्रोल, रॉकेल, रेल्व प्रवास महागला असताना आता अंडीही महाग झाली आहेत. त्यामुळे महागाईचा चोहोबाजूनं भडीमार होत असताना आता मुंबईकरांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.
मुंबईत अंड्यांच्या दरानं नवा उच्चांक गाठलाय. किरकोळ विक्रिती अंड्यांचे दर पाच रुपयावर गेले असून ६० रूपये डझन झाले आहेत.
मुंबईतल्या सर्वात मोठ्या तीन पुरवठादारांपैकी एक असलेल्या गोरेगावच्या पुरवठादारानं २६ जूनपासून अंड्यांचा पुरवठा थांबवलाय. ब्रिटानिया आणि विब्स या कंपन्यांकडून सध्या अंडी विक्रेत्यांना पुरवठा केला जातोय. तर मोठ्या पुरवठादारांपैकी एक असलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हरनंही सध्या पुरवठा थांबवलाय. कंपनीत एक अपघात झाल्यामुळं त्याठिकाणी सुरक्षेसंदर्भात उपाययोजनांचं काम सुरू असल्यानं तुर्तास अंड्यांचं उत्पादन बंद असल्याचं कंपनीतर्फे सांगण्यात आलंय.
रविवारी पुन्हा उत्पादन सुरू करण्यात येणार असल्याचं कंपनीनं सांगितलंय. मात्र या सर्व परिस्थितीचा मुंबईकरांना चांगलाच फटका बसतोय. अंड्याचे दर वाढल्याने गाडीवर मिळणारी बुर्जी, आम्लेट ही महाग झालेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.