रेल्वेमध्ये आजही मराठीची गळचेपी

रेल्वेमध्ये आजही मराठीची गळचेपी होत असल्याचे उदाहरण समोर आले आहे. सुभाष जगताप यांना हा अनुभव आला आहे. मध्य रेल्वेमध्ये जगताप यांनी माहितीच्या अधिकारात मराठीत अर्ज केला म्हणून तो परत पाठवण्यात आला असून इंग्रजी किंवा हिंदीत अर्ज करा असे त्यांना सांगण्यात आले आहे. 

Updated: Aug 21, 2015, 03:51 PM IST
रेल्वेमध्ये आजही मराठीची गळचेपी  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : रेल्वेमध्ये आजही मराठीची गळचेपी होत असल्याचे उदाहरण समोर आले आहे. सुभाष जगताप यांना हा अनुभव आला आहे. मध्य रेल्वेमध्ये जगताप यांनी माहितीच्या अधिकारात मराठीत अर्ज केला म्हणून तो परत पाठवण्यात आला असून इंग्रजी किंवा हिंदीत अर्ज करा असे त्यांना सांगण्यात आले आहे. 

मराठी रेल्वेमंत्री असताना मराठीची गळचेपी होत आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे. 

वाचा ब्लॉग : तिकीट चेकर काकांचा आडमुठेपणा... व्हॉट्सअॅपला पार धुडकावलं...

रेल्वेच्या मराठी द्वेषाचा अनुभव आलेले हे सुभाष जगताप.. जगताप यांनी 22 जून रोजी माहिती अधिकारात मध्य रेल्वेकडे मराठीत अर्ज केला होता. मात्र हा अर्ज मराठीत असल्याने फेटाळण्यात आला. सुभाष जगताप यांना तशा आशयाचं पत्रच मध्य रेल्वेच्या उपमुख्य व्यवस्थापक स्वाती सिन्हा यांनी पाठवलं आहे. मराठी द्वेष्ट्या रेल्वेने जगताप यांना इंग्रजीत पाठवलेल्या या पत्रात काय म्हटलं आहे ऐका जगताप यांच्या तोंडून..

आपण सादर केलेली माहिती मराठी भाषेत आहे. त्यामुळे आपल्याला काय माहिती हवे ते समजतं नाही. तुम्ही इंग्रजी किंवा हिंदीत अर्ज करावा जेणे करून तुम्हाला माहिती देता येईल.

त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रात मराठीचा वापर होणे बंधनकारक आहे. माहितीच्या अधिकार कायद्यातही स्थानिक भाषेत अर्ज करण्याची मुभा आहे. तरीही या तरतुदींकडे रेल्वेतील मराठी द्वेष्टे अधिकारी दुर्लक्ष करताना दिसतात. मराठी माणसाला चीड आणणारा हा अनुभव जगताप यांना पहिल्यांदा आलेला नाही. तीन वर्षापूर्वी ठाणे रेल्वे स्थानकात तिकीट खिडकीवर मराठी भाषेत बोलले म्हणून तिकीट क्लार्कने जगताप यांना हिंदीत बोला असे सांगितले होते. तेव्हाही जगताप यांनी मराठी द्वेष असणाऱ्या रेल्वेविरोधात आवाज उठवला होता. महाराष्ट्रात रेल्वेने मराठी भाषेचा वापर करावा म्हणून यापूर्वी अऩेकदा आंदोलने झाली. मात्र याचा रेल्वेवर काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसून येते.

मराठीच्या नावाने गळा काढणारी शिवसेना राज्यात आणि केंद्रात सत्तेत आहे. तर सुरेश प्रभू ही मराठी व्यक्ती रेल्वेमंत्री पदावर आहे. असं असतानाही रेल्वेकडून वारंवार मराठी भाषेची होणारी गळचेपी थांबलेली नाही. आता हा प्रकार समोर आल्यानंतर मराठीच्या नावाने गळा काढणारे पक्ष काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.