www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवाजी पार्क हेरिटेज म्हणून जाहीर करणाऱ्या मुंबईतील हेरिटेज समितीचीच चौकशी करण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत केली.
शिवाजी पार्क परिसरातील १८८ इमारतींसह शहरातील अनेक इमारतींचा हेरिटेज यादीत समावेश करण्यात आला आहे. हा समावेश करताना गैरप्रकार झाला आहे का? याची चौकशी केली जाणार आहे. तसंच हेरिटेजच्या प्रश्नवर येत्या १५ दिवसांत मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांची मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत. शिवाजी पार्कच्या इमारती पूर्वी हेरिटेजमध्ये नव्हत्या. त्यांचा समावेश हेरिटेजमध्ये कसा आला? तसेच काही जुन्या इमारतींचा पुनर्विकास झालेला असतानाही त्या हेरिटेज म्हणून कशा जाहीर करण्यात आल्या? याची चौकशी केली जाणार आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ३१ जुलै २०१२ पूर्वी म्हणजेच हेरिटेजची यादी जाहीर होण्यापूर्वी ज्या इमारतींना विकास परवानगी दिली आहे, त्यांना त्यांची कामे सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिली जाणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.