मुजोर व्यापाऱ्यांनी सीएम, राज, उद्धव यांना धुडकावले

एलबीटी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय. याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी जनतेला वेठाला न धरण्याचं आवाहन वारंवार केलंय. असं असतानाही व्यापाऱ्यांनी संप सुरूच ठेवलाय. आता मनसे आणि शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 9, 2013, 12:48 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
एलबीटी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय. याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी जनतेला वेठाला न धरण्याचं आवाहन वारंवार केलंय. असं असतानाही व्यापाऱ्यांनी संप सुरूच ठेवलाय. आता मनसे आणि शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय.
एलबीटी विरोधातील व्यापा-यांच्या बंदचा परिणाम संपूर्ण राज्यभर तीव्रतेनं जाणवू लागलाय.गेल्या चार दिवसांपासून मुंबईत बंद सुरु आहे. एलबीटीविरोधात बेमुदत बंदवर पुण्याचे व्यापारी देखील ठाम आहेत. सरकार जीवनाश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कारवाई करू शकत नाही. या बंदमधून अत्यावश्ययक सेवा वगळण्यात आल्याकयत असं सांगत पुण्याकतल्या व्याधपाऱ्यांनी सरकारला आवाहन दिलंय.
पिंपरी चिंचवड मध्येही LBT ला व्यापा-यांचा जोरदार विरोध आहे. हा कर लाथा बुक्क्यांचा कर असल्याचं तर कधी ब्लॅक लॉ असल्याची टीका व्यापाऱ्यांनी केलीय. ठाण्यात ४० व्यावसायिक संघटनेनं आज बेमुदत बंद पुकारलाय. ठाण्यात व्यापा-यांनी शंभर टक्के बंद पाळलाय. चंद्रपुरातही LBT च्या मुद्यावर व्यापा-यांनी आपला विरोध कायम ठेवलाय. व्यापा-यांनी राज्यभरात सुरु असलेल्या आंदोलननाला पाठींबा देत कडकडीत बंद पाळला. या बंद मध्ये किराणा, ठोक बाजार , पेट्रोल पंप यासह संपूर्ण व्यापार ठप्प आहे.

एलबीटीविरोधात व्यापा-यांच्या बंदचे परिणाम आता मुंबईत दिसू लागलेत. मुंबईत जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार सुरु झालाय.जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावानं विक्री होऊ लागलीये. काही व्यापा-यांनी बंदचा फायदा उठवायला सुरुवात केलीये. मागच्या दारानं वस्तूंची विक्री सुरु केली असून या वस्तूं चढ्य़ा भावानं विकल्या जातायेत. नाईलाजाने या वस्तू सर्वसामान्यांना विकत घ्याव्या लागतायेत. संपात सर्वसामान्यांचे हाल होणार नाहीत असा व्यापा-यांनी दावा केलाय.
मुंबईच्या बाजारपेठा बंद राहणं हे अयोग्य आहे. एलबीटी प्रश्नी राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय. एलबीटीप्रकरणी मुंबईतल्या व्यापा-यांनी बेमुदत बंद पुकारलाय. व्यापारी आणि मुख्यमंत्री दोन्ही आपआपल्या मुद्यावर ठाम असल्यानं हा पेच चिघळलाय, त्यामुळे आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आता शरद पवार पुढे सरसावलेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x