मुंबई : 'कामसूत्र' हा शब्द ऐकला की त्याकडे अश्लिल शब्दाच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. कामसूत्र हा शब्द साहित्यिकदृष्ट्या कितीही चांगला असला तरी त्याबद्दलची समाजात असलेली प्रतिमा बघता कोणाही त्या शब्दाचा वापर करणं टाळतं.
कामसूत्र हे पुस्तक शनिवारी प्रकाशित करण्यात येणार आहे. पण त्या शब्दामागची असलेली समजूत पाहात ते पुस्तक प्रकाशन करायचं की नाही असा प्रश्न ई-साहित्य प्रतिष्ठानला पडला होता. त्यामुळे त्यांनी जनसामान्यातून या बाबत विचारणा करण्याचं ठरवलं आणि नेटिझन्सचा कौल मागवला. चक्क अर्ध्या तासात हजाराहून अधिक प्रतिक्रिया आल्यात.
घर कसे ठेवावे, दैनंदिन जीवनात नेमक्या कोणत्या गोष्टी करायला हव्यात यापासून वस्त्रांची निवड कशी करावी याबाबतचा प्रकाश या पुस्तकात टाकण्यात आला आहे.
अश्लील साहित्य प्रकाशित करत असल्याचा आरोप ई-साहित्य प्रतिष्ठानवर होऊ नये यासाठी त्यांनी आधी सोशल मीडियावर नेटिझन्सचा कौल मागवला. त्या वेळी हजारभर नेटिझन्सनी अर्ध्या तासातच होकार कळवत वाचकांचे गैरसमज दूर व्हावेत यासाठी ते प्रकाशित करा, असे सांगितले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्यामुळेच शनिवारी "कामसूत्र‘चे प्रकाशन करण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.