दबंग आयपीएस शिवदीप लांडेंकडे अंमली पदार्थ विरोधी पथक

बिहारचे दंबग आयपीएस शिवदीप लांडे यांची मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. शिवदीप लांडे हे या आधी बिहारमध्ये कार्यकरत होते. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 12, 2017, 07:44 PM IST
दबंग आयपीएस शिवदीप लांडेंकडे अंमली पदार्थ विरोधी पथक title=

मुंबई : बिहारचे दंबग आयपीएस शिवदीप लांडे यांची मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. शिवदीप लांडे हे या आधी बिहारमध्ये कार्यकरत होते. 

बिहारमध्ये त्यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेची छाप सोडली होती. महाराष्ट्रातही आयपीएस शिवदीप लांडे जीवाचं रान करून कार्य करतील अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.

शिवदीप लांडे हे महाराष्ट्रात तीन वर्षासाठी आहेत. शिवदीप लांडे यांनी बिहारमधील अतिशय धोकादायक समजल्या जाणाऱ्या भागातही सर्व प्रकारच्या माफियांना सळो की पळो करून सोडले होते.

शिवदीप लांडे हे मराठी असले तरी त्यांच्या कार्यामुळे ते बिहारमध्ये सर्व सामान्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. एकदा त्यांना बदलीच्या ठिकाणी निरोप देत असताना रस्त्याच्या बाजूला 3 किमी पर्यंतची रांग लागली होती.

विशेष म्हणजे शिवदीप लांडे हे शेतकरी परिवारातून आहेत. शिवदीप लांडे यांनी अनेकदा वेशभूषा बदलून सत्य बाब समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.