टीसीएसचे हंगामी अध्यक्ष म्हणून इशहात हुसेन

टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस अर्थात टीसीएसचे हंगामी अध्यक्ष म्हणून इशहात हुसेन यांची निवड करण्यात आली आहे. सायरस मिस्त्रींच्या राजीनाम्यानंतर रिकामी असलेली ही जागा कोण घेणार, याबाबत उत्सुकता होती. 

Updated: Nov 10, 2016, 12:17 PM IST
टीसीएसचे हंगामी अध्यक्ष म्हणून इशहात हुसेन title=

मुंबई : टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस अर्थात टीसीएसचे हंगामी अध्यक्ष म्हणून इशहात हुसेन यांची निवड करण्यात आली आहे. सायरस मिस्त्रींच्या राजीनाम्यानंतर रिकामी असलेली ही जागा कोण घेणार, याबाबत उत्सुकता होती. 

टाटा समुहाचा महत्वपूर्ण उद्योग असलेल्या टीसीएसची जबाबदारी सध्या इशहात हुसेन यांच्याकडं सोपवण्यात आलीय. कायमस्वरुपी अध्यक्षाची निवड होईपर्यंत हंगामी म्हणून हुसेन काम पाहतील.