मुंबई : भाजपची सामना वर बंदी घालण्याची मागणी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचं सामनाने निवडणूक आयोगाला दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.
सामनाने निवडणूक आयोगाला दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.
देशात छुप्या पद्धतीने आणीबाणी लादण्याच्या दिशेने पडलेले पाऊल आहे, ज्यांना आमची देशद्रोह्यांविरुद्धची लढाई मान्य नाही, राष्ट्रीय विचारांच्या प्रचाराचा पोटशूळ आहे, अशा ढोंगी लोकांना नेहमीच 'सामना' बद्दल आकस राहिला आहे.त्यातूनच सामना विरुद्ध तक्रार केली असावी, असंही सामनाने स्पष्टीकरणात म्हटलंय
'सामाना'ची स्वतः ची अशी एक शैली आहे. त्यामुळे 'सामना' तले लिखाण तुलनेने आक्रमक वाटू शकते.
मात्र त्यामागे आचारसंहिता किंवा नियमांचे उल्लंघन करण्याचा हेतू नव्हता.'सामना' बद्दल पूर्वग्रह असणारे आणि त्यामुळे तक्रारी करणारयांबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही, असं स्पष्टीकरणात म्हटलंय.