ISISमध्ये सहभागी झालेला मुंबईचा तरुण भारतात परतला, एनआयएकडून चौकशी

ISISमध्ये सहभागी झालेला मुंबईचा तरुण भारतात परतला आहे. त्याची एनआयएकडून चौकशी करण्यात येत आहे.

Updated: Nov 28, 2014, 06:30 PM IST
ISISमध्ये सहभागी झालेला मुंबईचा तरुण भारतात परतला, एनआयएकडून चौकशी title=

मुंबई : ISISमध्ये सहभागी झालेला मुंबईचा तरुण भारतात परतला आहे. त्याची एनआयएकडून चौकशी करण्यात येत आहे.

कल्याण येथील चार तरुण इराकमधील ISIS या दहशतवादी संघंटनेच्या कारवायांमध्ये सहभाग घेण्याच्या वृत्तानं खळबळ उडाली होती. त्यापैकी दहशतवादी कृत्य करताना आरीफ मजीद नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी इसीस या दहशतवादी संघटनेनंच दिली होती. पण आता आरीफ मुंबईत परत आल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे.

आयबी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोनं आरीफला भारतात परत आणलं असून, त्याला मुंबईतच अज्ञातस्थळी ठेवण्यात आले आहे. मुंबई आणि ठाणे एटीएसचे अधिकारी त्या चौकशी टीममध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत आरीफच्या वडिलांशी 'झी मीडिया'नं फोनवरुन संपर्क केला असता, त्याचे वडाल एजाज़ मजीद यांनी तो भारतात आल्याचं सांगितलं. पण ते खरं आहे का खोटं, हे मीडियानंच तपासून पाहावं, असं उत्तर त्यांनी दिलं.

गेल्या मे महिन्यात कल्याणमधील आरिफ एजाज महम्मद ऊर्फ गुड्डू, अमन तांडेल, सलीम तानकी आणि फहर शेख असे चौघे तरूण गायब झाले होते. त्या चौघांनाही तपास यंत्रणांनी फरार घोषीत केलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.