कॉमेडीयन कपिल शर्मासह इरफान खानवर गुन्हा दाखल

कॉमेडियन कपिल शर्मा आणि सिने अभिनेते इरफान खान यांच्याविरूद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. 

Updated: Sep 13, 2016, 10:41 AM IST
कॉमेडीयन कपिल शर्मासह इरफान खानवर गुन्हा दाखल   title=

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा आणि सिने अभिनेते इरफान खान यांच्याविरूद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. 

आपल्या ओशिवरा येथील डीएलएच एन्क्लेव्ह इमारतीतील फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पी दक्षिण महापालिका विभागाचे सह अभियंते अभय जगताप यांनी एमआरटीपी कायद्यान्वये हा गुन्हा दाखल केलाय... 

अलिकडेच कपिल शर्मा यांनी थेट पंतप्रधानांना ट्वीट करून मुंबई महापालिका अधिका-यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र पालिका अधिका-यांनी कपिल शर्माविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला चांगलाच दणका दिलाय.