मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केलेत.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि या प्रकरणातील आरोपी रमेश कदम यांनी हा घोटाळा केला असल्याचा थेट आरोप सोमय्यांनी केलाय.
२०१४ मधे झालेल्या विधानसभा निवडणूकीत निधी म्हणून या घोटाळ्यातला पैसा वापरला गेला. या पैशातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० आमदार निवडून आल्याचा आरोप सोमय्यांनी केला.
तर काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात देशात चिटफंड कंपन्यांची चलती होती. त्या काळात सुमारे १ हजार ४८२ बोगस चिटफंड कंपन्या स्थापन झाल्याचं सोमय्या म्हणाले. मोदी सरकारच्या काळात अशा बोगस चिटफंड कंपन्यांवर कारवाईला गती मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. यासंबंधी केंद्रीय पातळीवर आता नवा कायदा येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.