कोकण रेल्वे अपघात, मुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस

कोकण रेल्वेला नागोठणेजवळ झालेल्या अपघातातल्या जखमींची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतलीय. सायन हॉस्पिटलमध्ये 15, केईएममध्ये 18 जणांना दाखल करण्यात आलं असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 5, 2014, 11:30 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकण रेल्वेला नागोठणेजवळ झालेल्या अपघातातल्या जखमींची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतलीय. सायन हॉस्पिटलमध्ये 15, केईएममध्ये 18 जणांना दाखल करण्यात आलं असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे.
या रेल्वे अपघातात 19 जणांचा मृत्यू झालाय. त्यापैकी 12 जणांची ओळख पटलीय तर अन्य 7 जणांची ओळख पटलेली नाही. अपघातमध्ये 169 जण जखमी झालेत. या जखमींना जवळच्या रोहा हॉस्पिटलसह मुंबईतल्या केईएम आणि सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सायन हॉस्पिटलमध्ये 15, केईएममध्ये 18 जणांना दाखल करण्यात आलं असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे.
तसंच मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयातही 5 जखमींना दाखल करण्यात आलंय. दरम्यान, दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातात अनेक निरपराधांना जीव गमवावा लागलाय. मात्र या अपघातात एक तीन महिन्याचं चिमुकलं बाळ सुदैवाने बचावलंय. या बाळावर रोहा इथल्या हॉस्पिटलमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र या अपघातामध्ये चिमुकल्याच्या आईचा करुण अंत झालाय तर वडिलांवर मुंबईतल्या सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.