नवी मुंबई : क्षुल्लक कारणासाठी आपल्याच हातांनी आपल्या दोन्ही मुलींची हत्या करून एका महिलेनं स्वत:ही आत्महत्या केलीय. नवी मुंबईतल्या कोपरखैरणे भागात ही धक्कादायक घटना घडलीय.
जागृती वाविया असं मृत महिलेचं नाव आहे. आत्महत्या करण्याअगोदरत जागृतीनं आपल्या दोन मुलींना गळफासावर चढवलं... आणि नंतर स्वत:चंही जीवन संपवलं.
कोपरखैरणेच्या सेक्टर नंबर २०३ मध्ये हरिप्रिया सोसायटीत जागृती आपल्या दोन मुली आणि नवऱ्यासहित राहत होती.
नवर्याला गुजरातला मतदानासाठी जाऊ नकोस, असे सांगूनदेखील आपलं न ऐकता तो गावी गेला... या गोष्टीचा तिला राग आल्याने तिने मुलींसह आत्महत्या केल्याचं समोर येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.