मुंबई : 'सर्व काही बाहेर काढण्याची माझी वेळ आली आहे', अशी अप्रत्यक्षपणे धमकी आणि इशारा आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी दिली आहे.
परदेशी जाण्यासाठी सुषमा स्वराज यांची मदत घेतल्याप्रकरणी वादाचे केंद्रबिंदू ठरलेले आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी आपल्या विरोधकांना इशारा देत आव्हान दिले आहे.
मोदी सध्या लंडनमध्ये आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याच्या विरोधकांच्या मागणीबाबत बोलताना ललित मोदी यांनी 'चुकीच्या व्यक्तीचा राजीनामा मागितला जात आहे.
मी तुम्हाला खात्री देतो की, लवकरच नवे वादळ धडकेल आणि बऱ्याच जणांना राजीनामा द्यावा लागेल,' असे सांगितले. त्यांनी आधीच्या सरकारबरोबर ई-मेलवरून झालेला संपर्क उघड करण्याचीही धमकी दिली आहे.
आपल्या ट्विटर अकाउंटवर ललित मोदींनी आधीच्या पंतप्रधान कार्यालयावर आरोपांचा 'बॉम्बगोळा‘ टाकणार असल्याचे सांगितले. शिवाय, यूपीए सरकारच्या अनेक मंत्र्यांची नावे घेत त्यांची माहिती उघड करणार असल्याचे सांगितले. लढाईच्या पवित्र्यात असलेल्या ललित मोदींनी 'हे युद्ध असून मी ते जिंकण्यासाठी लढाई हरण्याचे ठरविले होते', असंही ललित मोदी यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.