मुंबई : आता नव्या बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांवर लहान वाहनांसाठी टोल असणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.
दरम्यान, मुंबईतील एन्ट्री पॉईंट टोलबाबत 31 जुलैला अहवाल येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. १ जून पासून राज्यातील ५३ टोल नाक्यांवर लहान वाहनांना टोल मुक्ती देण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्यातील काही टोल नाक्यांवर लहान वाहनांना टोल आकारण्यात येतो. त्यात मुंबईतील एन्ट्री पाँइटच्या काही टोल नाक्यांचा समावेश आहे.
पण आता यापुढे कोणताही नवा रस्ता तयार झाला आणि त्याची टोल आकारणी करण्यात येणार असेल तर तेव्हा छोट्या वाहनांना सरसकट टोल मुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.