कोस्टल रोडवरून भाजपने केली उद्धव ठाकरेंची गोची

मुंबईकरांना कोस्टल रोडचं स्वप्नं दाखवलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी...खरंतरं तशी मूळ संकल्पना पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातली...पण आता त्याच्या अंमलबजावणीचा विडा उचललाय देवेंद्र फडणवीसांनी.. पण मुंबई महापालिकेच्या तोंडावर भाजपनं केलेल्या उद्धव ठाकरेंच्या गोचीमुळे दोन्ही पक्षांमध्ये कसा विस्तवही जात नाहीये याचाचं प्रत्यय येतोय. .

Updated: Jun 8, 2015, 07:36 PM IST
कोस्टल रोडवरून भाजपने केली उद्धव ठाकरेंची गोची title=

अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईकरांना कोस्टल रोडचं स्वप्नं दाखवलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी...खरंतरं तशी मूळ संकल्पना पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातली...पण आता त्याच्या अंमलबजावणीचा विडा उचललाय देवेंद्र फडणवीसांनी.. पण मुंबई महापालिकेच्या तोंडावर भाजपनं केलेल्या उद्धव ठाकरेंच्या गोचीमुळे दोन्ही पक्षांमध्ये कसा विस्तवही जात नाहीये याचाचं प्रत्यय येतोय. .

नरिमन पॉईंट ते कांदिवली...समुद्र किनाऱ्याला लागून जाणाऱ्या या रस्त्यानं आता पश्चिम उपनगरं जोडली जाणार आहेत. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खरंतरं कोस्टल रोडची संकल्पना विधानसभेच्या रणधूमाळीत पुढे आणली. बीएमसीच्या बजेटमध्ये कोस्टल रोडसाठी तरतूदही केली. पण आज काहीतरी वेगळचं पुढे आलंय.

भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी फडणवीसांची तोंडभरून स्तुती करताना त्यांची तुलना गडकरींशी केलीय. युतीच्या काळात बाळासाहेबांच्या स्वप्नातला मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे गडकरींनी पूर्ण केला. आता नागपूरचे च फडणवीस मुंबईचा पश्चिम किनाराही जोडणार असल्याचा खोचक सूर शेलार यांनी काढलाय.

निवडणुका तोंडावर दोन्ही पक्षातलं कुरघोडीचं राजकारण बाहेर येऊ नये यासाठी आशिष शेलार आणि रामदास कदम झटतायत...पण दोंघांच्या प्रतिक्रिया अगदी बोलक्या आहेत..

महत्त्वाचे मुद्दे 

  • 35 किलोमीटरचा हा कोस्टल रोड मुंबईचा चेहरा मोहरा पालटून टाकणार आहे.

  • प्रकल्पासाठी आठ हजार पाचशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

  • त्यासाठी 91 हेक्टर जमीन सरकारी कोट्यातून देण्यात येणार आहे

  • प्रकल्पासाठी येत्या काळात नेदरलंडच्या कंपनीशी टायअप ही करण्यात आलंय.

  • आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रकल्पाच्या उभारणीत महापालिकेलेला काहीचं उरलेलं नाही.

मुंबई महापालिेकेची निवडणूक आता वर्षभरावर येऊन ठेपलीय. विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपच्या उरात विजयाची हवा आहे. यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक संकल्पनेत पाचर मारण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शिवाय ही पाचार मारताना सेनेला मूग गिळून गप्प बसावंच लागेल याचीही काळजी भाजपचे धुरीण घेताना दिसताय. त्यामुळे दोन्ही पक्षातला हा छुपा संघर्ष निवडणुकीच्या तोंडावर चव्हाट्यावर आला तर आश्चर्य वाटायला नको...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.