www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रेल्वेने एटीव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त एका क्लिकरवर हे तिकिट एटीव्हीएमवर काढता येणार आहे.
घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकराचा वेळी, जुन्या एटीव्हीएम मशीनमुळे वाया जातो. तरीही या मशीनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो, हे मशीन कमी वेळेत आणि तिकीट काढतांना सहज सोप वाटेल, असं करण्याचा प्रयत्न रेल्वेचा आहे.
जुन्या एटीव्हीएममशीनवर हे शक्य होत नाही. भाषा, स्टेशनसारखे अनेक ऑप्शन तिकीट काढतांना समोर येतात, यात सेकंदात काही काम होतंच नाही.
तिकीट काढण्यासाठी मिनिटापेक्षा जास्त वेळ खर्च होतो. हा वेळ वाचावा आणि तिकीट खिडक्यांवरील गर्दी आणखी कमी व्हावी, असा प्रयत्न रेल्वेचा आहे.
हा बदल सध्या प्राथमिक स्वरूपात आहे. तोपर्यंत जुने मशीन काम करत राहणार आहेत. रेल्वेच्या ७५ स्थानकांवर, ३८४ एटीव्हीएम मशीन आहेत, आणखी २८८ एटीव्हीएम मशीन काही महिन्यात येणार आहेत.
सध्या पश्चिम रेल्वेला ९० मशीन्स आहेत, येत्या काही महिन्यात ५०० मशीन्स येणार आहेत, यासाठी निविदाही काढण्यात आल्या आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.