www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या आणखी दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. उस्मानाबाद मधून रवी गायकवाड यांना पुन्हा संधी देण्यात आली असून नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे शिवसेनेचे उमेदवार असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पहिली २० जणांची यादी
शिवसेना लोकसभेसाठी २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही यादी जाहीर केली होती.
शिवसेनेने सात ठिकाणी विद्यामान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. मात्र त्याचवेळी नविन सहा चेहऱ्यांना संधी दिली आहे.
या आधी भाजप, राष्ट्रवादी आणि आपने आपले लोकसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. आता शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्याने निवडणुकीतील रंगत आता वाढणार आहे.
कोणाला मिळाली संधी
- वायव्य मुंबई - गजानन किर्तीकर
- दक्षिण मुंबई - अरविंद सावंत
- दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे
- कल्याण - डॉ. श्रीकांत शिंदे
- परभणी - संजय जाधव
- यवतमाळ,नाशिम - भावना गवळी
- सातारा - रिपाईला (रामदास आठवले आग्रही) सोडला
- ठाणे - राजन विचारे
- रायगड - अनंत गिते
- रत्नागिरी -सिंधुदुर्ग - विनायक राऊत
- बुलडाणा - प्रतापराव जाधव
- अमरावती - आनंदराव अडसूळ
- औरंगाबाद - चंद्रकांत खैरे
- हिंगोली - सुभाषराव वानखेडे
- रामटेक - कृपाल तुमाने
- शिरूर - शिवाजीराव आढळराव पाटील