www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सट्टा बाजारातही तेजी आल्याचं चित्र आहे. देशभरातले सट्टेबाजांनी बोली लावायला सुरुवात केलीये. कोण भाजपला पसंती देतायेत तर कोण पंजावर पैसे लावण्यास इच्छुक आहेत. तर काहींचा आम आदमी पार्टी चमत्कार करेल यावर विश्वास आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सट्टे बाजार सक्रीय झालाय. एनडीएला जास्त जागा मिळतील मात्र बहुमतापासून ते दूर राहतील असा सट्टेबाजांचा कयास आहे. सट्टेबाजांच्या ताज्या रेटनुसार एनडीएच्या २३०-२३२ जागा जिंकण्याची आशा आहे. जर एनडीएला एव्हढ्या जागा मिळाल्या तर १०० रुपये लावलेल्यांना २०० रुपये मिळतील. जर एनडीएच्या जागा वाढून २५३-२५४ वर पोहचल्या तर ३०० रुपये आणि २७२ वर जागा गेल्या कर ४०० रुपये मिळणार आहेत.
सट्टेबाजारात काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी घसरण होण्याचा अंदाज आहे. सट्टेबाजांच्या हिशोबानुसार काँग्रेसला ६७-६९ जागा मिळतील. अशा स्थितीत १०० रुपयांची बोली लावणा-याला २०० रुपये मिळतील. जर काँग्रेस ८०-८२ जागांवर पोहचलं तर ३०० रुपये मिळतील. आणि जर काँग्रेसने १०० चा आकडा पार केला तर थेट ७०० रुपये खात्यात जातील.
सट्टेबाजांची तिसरी मोठी खेळी आम आदमी पार्टीवर आहे. आप जर ८-९ जागा खेचून आणेल तर १०० रुपयांवर २०० रुपये मिळतील. जर जागा १३-१५ वर पोहचल्या तर २०० रुपयांचा फायदा होणार...आणि जर आपने मुसंडी मारत १९-२० जागा जिंकल्या तर ५०० रुपये मिळणार आहेत.
सत्ता कोणाला मिळणार यावर हजारो कोटींचा सट्टा लागलाय. निकाल येईपर्यंत समिकरणे बदलतीलही.मात्र सध्या तरी राजकीय मैदानात आणि सट्टेबाजारात वातावरण गरम आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.