www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणूक जाहीर व्हायची बाकी असताना राष्ट्रीय राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे तसेच यादी जाहीर करण्याचा धडाका सुरू केलाय. आज शिवसेना लोकसभेचे उमेदवार जाहीर केलेत. २० उमेदवारांची पहिली यादी आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेने सात ठिकाणी विद्यामान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. मात्र त्याचवेळी नविन सहा चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर पाच ठिकाणी उमेदवार निवडीवर तिढा आहे. यामध्ये वाशिम, मावळ, कोल्हापूर, शिर्डी आणि उसन्माबाद या जागांचा समावेश आहे.
या आधी भाजप, राष्ट्रवादी आणि आपने आपले लोकसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. आता शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्याने निवडणुकीतील रंगत आता वाढणार आहे.
कोणाला मिळाली संधी
- वायव्य मुंबई - गजानन किर्तीकर
- दक्षिण मुंबई - अरविंद सावंत
- दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे
- कल्याण - डॉ. श्रीकांत शिंदे
- परभणी - संजय जाधव
- यवतमाळ,नाशिम - भावना गवळी
- सातारा - रिपाईला (रामदास आठवले आग्रही) सोडला
- ठाणे - राजन विचारे
- रायगड - अनंत गिते
- रत्नागिरी -सिंधुदुर्ग - विनायक राऊत
- बुलडाणा - प्रतापराव जाधव
- अमरावती - आनंदराव अडसूळ
- औरंगाबाद - चंद्रकांत खैरे
- हिंगोली - सुभाषराव वानखेडे
- रामटेक - कृपाल तुमाने
- शिरूर - शिवाजीराव आढळराव पाटील
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.