मुंबई : मॅगीवरची बंदी उठवायची की नाही याबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात निर्णय येण्याची शक्यता आहे. अन्न आणि औषध नियंत्रण मंडळ अर्थात fssai च्या अधिकाऱ्यांनी मॅगीमध्ये शिश्याचं अतिरिक्त प्रमाण आढळल्यानं ही बंदी घातलीय.
सरकारच्या या निर्णयाला मॅगी बनवणारी कंपनी नेस्लेनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. नेस्लेच्या याचिकेवर गेला जवळपास महिनाभर न्यायालयात युक्तीवाद झालाय. गेल्या आठवड्यात यासंदर्भातली सुनावणी पूर्ण झाली. आज उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यावर अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे.
दरम्यान नस्लेविरोधात सरकारनं 640 कोटी रुपयांच्या भरपाईचा दावाही दाखल केलाय. त्यामुळे आजच्या निर्णयाकडे सगळ्याचं लक्ष आहे. महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या २० चाचण्यांपैकी पाच चाचण्यांत मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण हे मर्यादेपेक्षा अधिक आढळले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.