मुलांनीच बेवारस सोडलेल्या 'त्या' आजींचं वृद्धापकाळ आश्वत...

रक्ताच्या नातेवाईकांनी टाकून दिलेल्या हंसा राजपूत यांना अखेर आधार मिळालाय. शिर्डीतल्या एका वृद्धाश्रमात आता त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध जाणार आहे. त्यांच्या घरच्यांचा मात्र आजही पत्ता नाही. 

Updated: Aug 12, 2015, 10:07 PM IST
मुलांनीच बेवारस सोडलेल्या 'त्या' आजींचं वृद्धापकाळ आश्वत... title=

मुंबई : रक्ताच्या नातेवाईकांनी टाकून दिलेल्या हंसा राजपूत यांना अखेर आधार मिळालाय. शिर्डीतल्या एका वृद्धाश्रमात आता त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध जाणार आहे. त्यांच्या घरच्यांचा मात्र आजही पत्ता नाही. 

मुलांनी फूटपाथवर टाकून दिल्यानंतर 21 जुलैला त्यांना मुंबईच्या जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हंसा राजपूत यांची करूण कहाणी 'झी 24 तास'नं महाराष्ट्रासमोर मांडली होती. त्यानंतर आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांनी त्यांची भेट घेतली आणि यंत्रणा फिरली. शिर्डीतल्या द्वारामाई वृद्धाश्रम संस्थेनं हंसा यांना दत्तक घेतलंय, अशी माहिती ट्रस्टचे व्यवस्थापक बी. श्रीनिवासन यांनी दिलीय.  

हंसा आजींची तब्येत आता सुधारतेय. मात्र, त्यांना अजूनही जुन्या घटना पूर्णपणे आठवत नाहीत. त्यांच्या कुटुंबियांपैकीदेखील कुणीच पुढं आलेलं नाही. त्यामुळं त्यांच्या घरच्यांचा सध्या काहीच पत्ता नाहीए. 

हंसा आजींच्या आयुष्याचा पूर्वार्ध त्यांनाच नीटसा आठवत नाही. मात्र, आयुष्याचा उत्तरार्ध या वृद्धाश्रमात आश्वस्त झालाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.