समीर भुजबळांची एसीबीकडून ‘राऊंड टेबल’ चौकशी

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांची एसीबीकडून तीन तास प्रदीर्घ चौकशी करण्यात आली.

Updated: Feb 20, 2015, 05:48 PM IST
समीर भुजबळांची एसीबीकडून ‘राऊंड टेबल’ चौकशी title=

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांची एसीबीकडून तीन तास प्रदीर्घ चौकशी करण्यात आली.

एसीबीच्या १८ अधिकाऱ्यांनी समीर भुजबळ यांची राऊंड टेबल चौकशी केली. एकूण ११ मुद्दयांवर समीर भुजबळ यांची चौकशी झाली. महाराष्ट्र सदन, एमईटी, कोळसा घोटाळा, टोल नाका आणि इतर विषयांचा समावेश आहे. 

तीन तासांत ‘एमईटी’च्या शेकडो एकर जागेसंबंघी समीर भुजबळ यांची चौकशी करण्यात आली. . बुल्स, अंधेरी आरटीओ ऑफिसचे २२ माळे , नवी मुंबई येथे हेक्स बॉक्स आर्मस्ट्राँग आणि एसआरएमध्ये मिळालेले कंत्राट हे चौकशीचे विषय आहेत. तसंच नाशिक इथल्या दिंडोरी, गोवर्धन आणि इतरत्र असलेली शेकडो एकर जमीन आणि पैशांच्या व्यवहाराबद्दल समीर भुजबळ यांची चौकशी करण्यात आली. 

तर उद्या पुन्हा चौकशी करता समीर भुजबळ यांना पुन्हा बोलावण्यात आलंय. लाचलुचपत विभागानंतर अमंलबजावणी संचालनालय समीर भुजबळ यांची चौकशी करणार आहे. उद्या छगन भुजबळ आणि त्यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ यांची चौकशी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोप काय आहेत ते पाहूया ग्राफीक्सच्या माध्यमातून...

  • बेनामी कंपन्या स्थापन करताना कंपन्यांचे खोटे पत्ते

  • खाडाखोड केलेली कागदपत्रे

  • असामान्य मूल्यांकन

  • बेनामी व्यवहार

  • स्वतःच्या ट्रस्टला असामान्य पद्धतीने देणग्या

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.