इंधर दर कमी झाले, प्रवासी वाहतूक दर कधी- भाजपची मागणी

देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले आहेत. त्यामुळं आता रिक्षा, प्रवासी वाहतूक सांधनांचे दरही कमी करावे, अशी मागणी भाजपनं परिवहन मंत्र्याकडे केलीय. त्यासंबंधीचं पत्रच त्यांनी दिवाकर रावते यांना दिलंय.

Updated: Feb 20, 2015, 04:13 PM IST
इंधर दर कमी झाले, प्रवासी वाहतूक दर कधी- भाजपची मागणी title=

मुंबई: देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले आहेत. त्यामुळं आता रिक्षा, प्रवासी वाहतूक सांधनांचे दरही कमी करावे, अशी मागणी भाजपनं परिवहन मंत्र्याकडे केलीय. त्यासंबंधीचं पत्रच त्यांनी दिवाकर रावते यांना दिलंय.

भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्र लिहिलंय. इंधन दर कमी झाल्यानंतरही त्याचा फायदा सामान्य प्रवाशांना मिळत नाहीय. रिक्षा, टॅक्सीचं भाडं करावं म्हणजे त्याचा फायदा विद्यार्थी आणि रोजचा प्रवास करणाऱ्या नागरिकांना मिळेल, असं या पत्रात म्हटलंय. 

त्यामुळं आता भाजपच्या या मागणीला भाजप-शिवसेनेचं सरकार पूर्ण करतं का? आणि सामान्य प्रवाशांना फायदा मिळतो का? हे पाहावं लागले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.