www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत मोनो-मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामात मुंबई महानगर प्रदेशिक प्राधिकरणानं (एमएमआरडीए) टंगळमंगळ केलीय. त्यामुळे आता हे काम शेवटी पालिकेनंच हाती घेतलंय.
आता हे खड्डे बुजवण्याचं काम पालिका करणार आहे. यासाठी येणाऱ्या खर्चाचं बील मात्र एमएमआरडीएकडे धाडण्यात येईल, असं पालिकेचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांनी सांगितलंय.
मोनो आणि मेट्रोचे काम मुंबईत अनेक ठिकाणी सुरू आहे. या प्रकल्पांच्या मार्गावरील खड्डे बुजविण्याची जबाबदारीही एमएमआरडीएची आहे. मुंबईत सध्या रस्त्यांवर जवळपास ४०० खड्डे पडलेत. परंतु प्राधिकरणाकडून खड्डे भरण्याची कोणतीच हालचाल झाली नाही. याचा फटका मुंबईकरांना बसतोय. त्यामुळे पालिकेनंच हे खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतलाय.
श्रीनिवास हेच याअगोदर मेट्रोचं काम पाहत होते. त्यामुळे त्यांनी हा उपाय अंमलात आणायचा निर्णय घेतलाय. या कामांचं बिल एमएमआरडीएला पाठवण्यात येणार असल्याचं श्रीनिवासन यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सांगतलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.